S M L
Football World Cup 2018

'शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार'; सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा

शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 11:03 PM IST

'शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार'; सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा

14 मार्च : शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला आहे. उत्तरप्रदेशच्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार असा विश्वास यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस -राष्ट्रवादी 1999मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात. त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.

अर्थसंकल्पाच्या चर्चेला उतरत देत असतांना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर उलट हल्ला चढवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close