शरद पवारांना नाचता येईना अंगण वाकडे, अर्थमंत्र्यांची जोरदार टीका

शरद पवारांना नाचता येईना अंगण वाकडे, अर्थमंत्र्यांची जोरदार टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा इव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'नाचता येईना अंगण वाकडे', ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

  • Share this:

वर्धा, 2 जून- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा इव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'नाचता येईना अंगण वाकडे', ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून पवारांनी इव्हीएमला दोष दिला आहे. 'धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे', असं साधारणतः पवारांचं राजकारण सुरू असल्याचा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. सोबतच 47 वर्षे यांच्या हातात राज्याची सत्ता होती पण अद्यापही यांना आम्ही राज्याचे सगळे प्रश्न सोडवले, असा दावा करता येत नसल्याचीही टीका केली. सुधीर मुनगंटीवार हे वर्ध्याचे पालकमंत्री आहेत.

हिंदीच्या सक्तीवर चर्चेतून तोडगा निघावा..

तामिळनाडू येथील हिंदीच्या सक्तीवर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालिन मोठ्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक भावना असावी, राज्याराज्यात संघीय प्रणाली अवलंबिल्यानंतर एकमेकांवरील स्नेह, प्रेम वाढावे, त्यामुळे एक विषय त्याकाळी ठेवला होता. या विषयावर चर्चेतून, संवादातून तोडगा काढत या विषयावर निर्णय व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

निधी चौधरी यांच्या 'त्या' ट्वीटवर काय म्हणाले..

मुंबई महापालिका आयुक्त निधी चौधरी यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, यातील खरं, खोटं तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

माझं ट्वीट अशा पद्धतीचं नसून मी स्वतः महात्मा गांधीजींच्या विचारावर राज्यकारभार चालावा, असं स्पष्टीकरण निधी चौधरी यांनी दिले आहे.


VIDEO: मातृत्वाला काळीमा! पोटच्या मुलीला दिलं मंदिरात सोडून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या