S M L

SPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

वयाच्या तिसाव्या वर्षी कविताला ब्रेन ट्युमर झाला आणि सर्व सामन्याप्रमाणे आनंदी जीवनाच्या भरारी घेणाऱ्या कविताचा ट्युमरशी संघर्ष सुरू झाला.

Updated On: Jan 16, 2019 09:48 PM IST

SPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी


स्वप्नील घाग, प्रतिनिधी

रत्नागिरी,16 जानेवारी : गुहागरमधील पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेतला आणि 21 किमीचे अंतर पार केले तिचं नाव कविता दीपक कदम. वयाच्या तिसाव्या वर्षी कविताला ब्रेन ट्युमर झाला आणि सर्व सामन्याप्रमाणे आनंदी जीवनाच्या भरारी घेणाऱ्या कविताचा ट्युमरशी संघर्ष सुरू झाला. 70 टक्के अपंगत्त्व आलेल्या कविताने 21 किमीची शर्यत तर पार केलीच, शिवाय जीवनाच्या जगण्याच्या रोजच्या लढाईत कविता जिंकली.

कविताचा पती हा पोलीस खात्यात PSI पदावर आहे. काही वर्षांपूर्वी कविताचं दीपक कदम यांच्याशी थाटात लग्न झालं. काही वर्षांनी कविताने जुळ्यांना जन्म दिला आणि कविताचा परिवारात कविता, तिचा नवरा आणि तीन मुलं असा पाच जणांचा संसार सुखासमाधानात नांदत होता.

तिन्ही चिमुरडे शालेय जीवनात प्रवास करत असतानाच या कदम परिवाराला मोठा धक्का बसला. कविताला ब्रेन ट्युमर असल्याचं निदर्शनास आलं. तातडीने कविताची शस्त्रक्रिया झाली आणि यात ती 70 टक्के विकलांग झाली. यातून कविताला उभं राहणं शक्य नव्हतं, मात्र एका आदर्श पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते. त्याच प्रमाणे इथे कविताला उभं करण्यासाठी खाकीमधील आदर्श नवरा खंबीरपणे पाठीशी उभा राहिला.

Loading...

तारुण्यात बायको विकलांग झाली की, बायकोकडे दुर्लक्ष करणारे वेळप्रसंगी दुसरं लग्न करणारे नावरोबा पाहायला मिळतात. मात्र, अशा या परिस्थितीत बायकोला स्वीकारून तिला पूर्ण ताकदीनिशी उभं करण्याचं स्वप्न खाकीतील पतीने पाहिलं. त्यासाठी कदम यांनी खडतर प्रयत्न देखील केले. पत्नीला उभं करण्यासाठी जेवढे कष्ट पती घेत होता, तेवढेच प्रयत्न आपल्या आईसासाठी चिमुकली लेकरं देखील करत होती.

अंथरुणाला खिळून बसलेली पत्नी तिच्या हृदयात जगण्याची जिद्द निर्माण करत आणि त्या जिद्दीला तेवढंच बळ कविताने देखील दिलं. त्यातून हळूहळू कविताच्या प्रकृतीत सुधारणा झाली. काही दिवसांनी ती चालू लागली. थोडी पळू लागली. सर्व प्रकारचे आवश्यक व्यायाम करत कविताच्या शरीरात आत्मविश्वासाबरोबर ताकदही वाढू लागली. याच आत्मविश्वासाच्या जोरावर उभी राहिलेली कविता 21 किमीचे अंतर जेव्हा पार करते, तेव्हा तिने खऱ्या अर्थाने जीवनाची मॅरेथॉन जिंकली, असंच म्हणावं लागेल. तिच्या या जिद्दीच सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.

समाजात विविध प्रकारच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्ती जेव्हा जीवन संपलंय, असं म्हणतात. तेव्हा कविताची ही कहाणी त्यांच्या जगण्याची उमेद बनली आहे. शिवाय प्रेयसीच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधण्याची उदाहरणं आहेत. मात्र, पोलीस पतीसाठी कविताच त्याची मुमताज आहे.


========================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2019 09:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close