दुष्काळावर मात करून त्यांनी फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती, कमावले ५लाख रुपये!

आम्ही आधी डाळिंबी लावली पण खराब झाल्यामुळे नुकसान झालं. त्यानंतर द्राक्ष लावले पण त्यातही तोटा झाला. त्यानंतर ड्रॅगनफ्रुटबद्दल माहिती मिळाली.

  • Share this:

 आसिफ मुरसूल, सांगली,१९ नोव्हेंबर : पाणी कमी असल्यानं शेती धोक्यात आली. शेती धोक्यात आल्यानं विस्थापन वाढले. पण सांगलीच्या जत तालुक्यातल्या पुजारी दांपत्यानं मात्र दुष्काळात वाढणाऱ्या काटेरी फळपिकाची शेती यशस्वी करत दुष्काळात पाय घट्ट रोवून टिकण्याची कला शिकून घेतली आहे.

दुष्काळी जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात कल्लप्पा आणि गायत्री पुजारी हे शेतकरी दांपत्या गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ उत्तम शेती कसतंय.

 द्राक्ष आणि डाळिंबाचे मळे फुलवलेल्या या पतीपत्नीनं गेल्या 2 ते 4 वर्षांत दुष्काळासोबत मोठ्या तीव्रतेनं सामना केला.

 जास्त पाणी लागणाऱ्या डाळिंब आणि द्राक्ष पिकाला बगल द्यावी लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी दुष्काळी भागात नव्यानं दाखल झालेल्या ड्रॅगन फ्रुट पिकाच्या लागवडीकडं आपला मोर्चा वळवला.

 कमी पाण्यात हे पीक येत असलं तरी ते उत्कृष्टरित्या जगवणं आणि वाढवण्याचं आवाहन त्यांच्यापुढं होतंच. त्यांनी जुलै महिन्यात ड्रॅगनफ्रुटची लागवड केली. आता त्यांच्या शेतात ड्रॅगनफ्रुटचा काटेरी मळा बहरलाय. पण हे पिक लावताना त्याना अनेकांनी नावंदेखील ठेवली.

आम्ही आधी डाळिंबी लावली पण खराब झाल्यामुळे नुकसान झालं. त्यानंतर द्राक्ष लावले पण त्यातही तोटा झाला. त्यानंतर ड्रॅगनफ्रुटबद्दल माहिती मिळाली. अत्यंत आरोग्यदायी फळ असल्याचं कळालं. तसंच या पिकाला पाणीही कमी लागते.

त्यानंतर इंटरनेटवरून माहिती घेतली आता पिक चांगले आले. आमदार-नेते आणि परदेशी पर्यटक पाहून गेले. या पिकातून ३ लाखांचे उत्पादन मिळाले आणि २ लाखाचे पिक शेतात आहे अशी माहिती गायत्री पुजारी यांनी दिली.

 ड्रॅगनफ्रुटसाठी त्यांनी सिमेंटचे खांब उभे केले. रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं काम सोपं झालं. आता या झाडांना आठवड्यातून एकदा तासभर पाणी दिलं जातं. फळं यायला आता सुरुवात झाली आहे.

 दुष्काळी पट्ट्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या पिकाकडं वळू लागलेत. द्राक्ष डाळिंबापेक्षा या पिकाची कमी पाण्यात येण्याची खात्री जास्त आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं शेतकरी या पिकाच्या लागवडीची मागणी करतायत.

 ड्रॅगनफ्रुटच्या पिकातून एकरी किमान 1 ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची खात्री आहे. दुष्काळात बाकीची पिकं टिकत नसताना ड्रॅगनफ्रुटचं पीक शेतकऱ्यांना जास्त जवळचं वाटू लागलंय.

ड्रॅगनफ्रुटच्या पिकातून एकरी किमान 1 ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची खात्री आहे.

दुष्काळात बाकीची पिकं टिकत नसताना ड्रॅगनफ्रुटचं पीक शेतकऱ्यांना जास्त जवळचं वाटू लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 09:41 AM IST

ताज्या बातम्या