हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे - सुब्रमण्यम स्वामी

हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे - सुब्रमण्यम स्वामी

ब्रिटिशांनी आपल्या लोकांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण केली. मोगलांचा पराभव मराठ्यांनी केला पण तोपर्यंत आपण इतके थकून गेलो की इंग्रजांशी लढण्याची ताकदच आपल्यात राहिली नाही.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 10 फेब्रुवारी : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. टोकाची आणि स्पष्ट मतं व्यक्त करुन अनेकदा त्यांनी भाजपलाही अडचणीत आणलं आहे. मुंबईत रविवारी एका व्याख्यानात बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातल्या हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे. हिंदू आणि मुस्लिम एकाच परिवाराचा भाग आहेत पण ते स्वत:ला घोरी, गझनीचे वंशज समजत असतील तर त्यांना या देशात स्थान नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.


आणखी काय म्हणाले स्वामी?


मोदींनी या बाबत विचार करावा की जिंकून आल्यानंतर पहिल्यांदा राम मंदिराचा प्रश्न सोडवावा. मला नाही वाटत नाही की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. कारण मी अनेक मुस्लिमांशी बोलत असतो. मशीद अमूक एकाच ठिकाणी असावी असं काही नाहीये ती कुठेही असू शकते. कोर्टाने पण म्हटलं आहे मशीद हा इस्मामचा अविभाज्य भाग नाहीये.


कोर्टाच्या आदेशाची वाट पाहण्यची करायची नाही राम मंदिराचं काम सुरु करता येईल. मंदिराची तयारी सगळी झालीये अगदी 2 वर्षात मंदिर होऊ शकतं. तीन मंदिरं सोडून द्या - कृष्ण मंदिर, राम मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर आणि आम्ही मग 40 हजार मंदिरं सोडून देऊ.


भारत देश खूप प्राचीन देश आहे. युनेस्कोनं जगात कोणते देश प्राचीन आहेत याचा ५ वर्षांपूर्वी अभ्यास केला. 46 पैकी 45 देश गायब झाले आहेत. यात एकच देश अजून टिकून आहे तो म्हणजे आपला भारत.


ब्रिटिशांनी हा देश नाहीये असं म्हणण्याचा प्रयत्न केला. तर अनेकानेक देश एका जागेत आहे असं म्हटलं. देशात आर्य आहेत आणि द्रविडही आहेत. अभ्यासाद्वारे हे सिद्ध झालंय की या देशातील सगळ्यांचा डीएनए एकच आहे.


रंगात फरक असेल तो सूर्यप्रकाशामुळे. ब्राम्हण आणि दलित किंवा हिंदु आणि मुस्लिम यांचा डीएनए एकच आहे. मी ओवेसीला म्हणालो होतो एकदा आपण हैदराबादच्या लॅबमध्ये टेस्ट करु तर दोघांचा डीएनए एकच असेल, पण ते काही अजून तयार नाहीत.

कृष्ण भगवानानं म्हटलंय की वर्ण हे गुणांमुळे तयार होतात. ब्राम्हण घरात जन्म झाल्यामुळे कोणी काही ब्राम्हण होत नाही. वाल्मिकी दलित घरात जन्मले पण ते महर्षी झाले.


डॉ. आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीला 90 च्या दशकात भाजपने  भारतरत्न दिला. त्यांना लोक भीमराव म्हणायचे पण डॉक्टर म्हणणं टाळलं जायचं. नेहरु परदेशात गेले आणि नापास झाले तरीही त्यांना पंडित म्हणायचे. नेहरु गांधी परिवारात कोणीही पदवीधर नाही.


ब्रिटिशांनी आपल्या लोकांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण केली. मोगलांचा पराभव मराठ्यांनी केला पण तोपर्यंत आपण इतके थकून गेलो की इंग्रजांशी लढण्याची ताकदच आपल्यात राहिली नाही.


देशात 600 वर्षं मुस्लिमांनी राज्य केलं, 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तरीही आपल्याकडे आजही देशात 82 टक्के लोक हिंदू आहेत. आपल्याकडे विजयनगर साम्राज्य 300 वर्षं होतं पण आपल्याकडे सगळा मुगलांचा इतिहास आहे, विजयनगरचा असलाच तर पुसटसा उल्लेख आहे.


विकासामुळे नाही तर देशाच्या संस्कृतीमुळे कोणत्याही देशाची ओळख निर्माण होत असते. अमेरिकेत प्रत्येक शहरात योगा सुरु आहे आणि त्याला ख्रिश्चन योगा म्हणतात.


हॉलीवूडची एक अभिनेत्री इकडे आणि तिनं हिंदू धर्म स्वीकारला.संस्कृत भाषा कधीच जुनी होऊ शकत नाही. Artificial intelligence करता सर्वोत्तम भाषा संस्कृत असल्याचा नासानं सांगितलंय.


महात्मा गांधी नसते तर इंग्रज कोणाकडे राज्य सोपवून गेले असते? गांधींचं काम मोठं आहे. सरदार पटेलांनी देशाची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली


2020 ते 2030 दरम्यान पाकिस्तानचे चार तुकडे होतील. यातूनच पाकिस्तान नष्ट होणार आहे. पाकिस्तान आपल्यावर अणुबाँब टाकू शकत नाही कारण त्याच्या चाव्या अमेरिकेकडे आहे.जोखीम पत्करल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 08:48 PM IST

ताज्या बातम्या