Elec-widget

"चुकीचा अंदाज वर्तवला म्हणून हवामान विभागाविरोधात गुन्हा दाखल करा"

चुकीचे आणि खोटे अंदाज वर्तवला म्हणून राज्याच्या हवामान खात्याने शेतकऱ्यांची फसवणूक केलीये. त्यामुळे हवामान खात्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी गंगाभीषण थावरे या शेतकरी नेत्यानं केलीय.

  • Share this:

15 जुलै : बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये अजब आणि अभूतपूर्व तक्रार दाखल करण्यात आलीये. चुकीचे आणि खोटे अंदाज वर्तवला म्हणून राज्याच्या हवामान खात्याने शेतकऱ्यांची फसवणूक केलीये. त्यामुळे हवामान खात्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी गंगाभीषण थावरे या शेतकरी नेत्यानं केलीय. मात्र यामुळे पोलीस प्रशासन चक्रावून गेले असून काय आणि कसा गुन्हा दाखल करावा असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे.

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केलंय. हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज गंगाभीषण थावरे यांनी दाखल केला आहे.

हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या. त्यासाठी महागडे बियाणं खरेदी केलं.

प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही आणि त्यामुळे उगवलेले पीक करपून गेलं. तर काहींना पेरणीयोग्य पाऊसच नसल्याने बियाणे आणि खतं घरातच ठेवावे लागले आहेत ज्याची किंमत आज मातीमोल झाल्याचं थावरे यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...