'मी शिवसैनिकच, राहुल गांधींची मुलाखत पैसे घेऊन केली'

सुबोध भावेंनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात घेतलेल्या राहुल गांधींच्या मुलाखतीची मोठी चर्चा झाली होती.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 01:20 PM IST

'मी शिवसैनिकच, राहुल गांधींची मुलाखत पैसे घेऊन केली'

नाशिक, 25 मे : 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत मी पैसे घेऊन केली. तो माझा व्यवसाय आहे. पण मी एक शिवसैनिक आहे,' असं अभिनेते सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. सुबोध भावेंनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात घेतलेल्या राहुल गांधींच्या मुलाखतीची मोठी चर्चा झाली होती. त्याबद्दलच आता सुबोध भावेंनी खुलासा केला आहे.

'एक राजकीय नेता म्हणून मला राहुल गांधी बद्दल आदर आहे. सोशल मीडियावर लोकं आज काहीही टाकतात. पण सोशल मीडिया देश चालवत नाही. 2014 आणि 2019 या कालावधीतील राहुल गांधींमध्ये मोठा बदल झाला आहे. राहुल गांधी 2024 ला अजून वेगळे असतील,' असं म्हणत सुबोध भावेंनी राहुल गांधींबद्दलच आपलं मत व्यक्त केलं आहे.

सुबोध भावे आणि राहुल गांधींची पुण्यातील मुलाखत

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये अभिनेता सुबोध भावे याने सूत्रसंचालन केलं होतं. तसंच राहुल गांधींची मुलाखतही घेतली होती. या कार्यक्रमाची मोठी चर्चाही झाली होती. याच कार्यक्रमात सुबोध भावेंनी मला राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असं म्हटलं होतं.

मोदी-मोदी अशा घोषणा

Loading...

पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केल्यानंतर सभेमधल्या काही जणांनी मोदींच्या घोषणा द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा मोदींच्या घोषणांची मला काहीच अडचण नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


VIDEO: 'राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये येतील'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...