News18 Lokmat

लैंगिक शोषण : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक

काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना पोलिसांनी केली अटक आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:43 AM IST

लैंगिक शोषण : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक

चंद्रपूर, 21 मे: काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना पोलिसांनी केली अटक आहे. या दोघांनाही विनयभंगाच्या आरोपाखाली केली अटक असून राजुरा येथील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांच्या विरोधात शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार होती. राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सुभाष धोटे वादात अडकले आहेत.

राजुरा येथील कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. मात्र संस्थाचालक असलेल्या सुभाष धोटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित विद्यार्थिनीवर जबरदस्तीचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात विद्यार्थिनीने दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आला होता. तसेच पीडिताला व भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीने दिली होती. या प्रकरणानंतर सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

याप्रकरणी काल गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना आज अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सुभाष आणि अरुण धोटे यांना बल्लारपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

याआधी राजुरा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याने सुभाष धोटेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ते जामीनावर आहेत.


Loading...


घाटकोपरमध्ये भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...