कोल्हापुरी चपलेचं होणार संशोधन

याच चप्पल व्यवसायातल्या अडचणी आणि समस्या दूर करुन कोल्हापुरी चपलेचं संशोधन केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 6, 2017 04:21 PM IST

कोल्हापुरी चपलेचं होणार संशोधन

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

06 मे : कोल्हापूर म्हटलं की झणझणीत मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा...त्याचबरोबर कोल्हापूर म्हटलं की रांगडी कोल्हापुरी चप्पल...याच चप्पल व्यवसायातल्या अडचणी आणि समस्या दूर करुन कोल्हापुरी चप्पलेचं संशोधन केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलंय.

कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत कोल्हापुरी चप्पल कारागिरांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या मदतीनं कोल्हापुरी चप्पल बाबात संशोधन केलं जाणार असून पेटंट मिळवण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्याही दूर करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलंय. या कार्यशाळेच्या निमित्तानं कोल्हापूरमधल्या चप्पल व्यावसायिकांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्य़ा. त्यावर देसाई यांनी हे आश्वासन दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...