S M L

चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांनी सर केलं एव्हरेस्ट शिखर!

चंद्रपुरातले चार विद्यार्थी अखेर एव्हरेस्ट शिखरावर पोहचलेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 3 शासकीय आश्रमशाळेतले दहा विद्यार्थी गेल्या 11 एप्रिलला चंद्रपूरहून काठमांडूला गेले होते.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 02:35 PM IST

चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांनी सर केलं एव्हरेस्ट शिखर!

चंद्रपूर, 16 मे : चंद्रपुरातले चार विद्यार्थी अखेर एव्हरेस्ट शिखरावर पोहचलेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 3 शासकीय आश्रमशाळेतले दहा विद्यार्थी गेल्या 11 एप्रिलला चंद्रपूरहून काठमांडूला गेले होते. तिथून त्यांचा प्रवास लासामार्गे माऊंट एव्हरेस्ट असा सुरू झाला होता. आज हे विद्यार्थी एव्हरेस्टवर पोहोचलेत.

18 एप्रिलनंतर त्यांची चढाई सुरु झाली होती. पहाटे 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत कविदास आणि उमाकांत या दोन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला. त्यांच्या पाठोपाठ परमेशने 4 वाजून 25 मिनिटांनी तर 4 वाजून 35 मिनिटांनी मनीषा ही विद्यार्थिनी एव्हरेस्टवर पोहचली.

देशात शासकीय आश्रमशाळेतून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे चौघे पहिले आदिवासी विद्यार्थी ठरले आहेत. एव्हरेस्टसाठी आदिवासी विभागानं सहा टप्प्यात प्रशिक्षण दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close