औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून गुंडाचा शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला

औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून गुंडाचा शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला

  • Share this:

 औरंगाबाद, 23 नोव्हेंबर: औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन गुंडांनी लाठ्याकाठ्यांसहित शाळेतल्या विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

औरंगाबादमध्ये उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. गुरु तेग बहाद्दुर शाळेत  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं. या भांडणात एक विद्यार्थी जखमी झाला. ते हल्लेखोर शाळेत शिरल्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी गेट बंद केलं  आणि पोलीसांना पाचारण केलं. गेट बंद केल्याने या गुंंडाना बाहेर जाता आलं नाही .  नंतर पोलिसांनी या हल्लेखोर मुलांना ताब्यात घेतलं आहे.

हल्ली शाळेत गुंडागर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे.पुण्यातही काही दिवसांपूर्वी एका शालेय विद्यार्थ्याने प्राध्यापकांवर धारधार शस्त्राने वार केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 12:50 PM IST

ताज्या बातम्या