S M L

मालवणच्या वायरी समुद्रात 8 विद्यार्थी बुडाले, 2 अत्यवस्थ

मालवणच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. बेळगावचे 11 विद्यार्थी फिरायला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.

Sonali Deshpande | Updated On: Apr 15, 2017 05:28 PM IST

मालवणच्या वायरी समुद्रात 8 विद्यार्थी बुडाले, 2 अत्यवस्थ

15 एप्रिल : मालवणच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. बेळगावचे 11 विद्यार्थी फिरायला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.वायरी समुद्रात बुडून 11 पैकी 8 जणांचा मृत्यू झाला. 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

बेळगावच्या मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी होते. वायरीमध्ये समुद्र सुरुवातीपासूनच खूप खोल आहे.. स्थानिक लोक पर्यटकांना सावध करत असतात. पण लोक ऐकत नाहीत. पोहता येत असो किंवा नसो, समुद्रात उतरतात. भरती येते, काय करायचं ते कळत नाही आणि हकनाक जीव जातो.तरुण लोकांमध्ये हे असले प्रकार करण्याचं प्रमाण जास्त आहे.

आयबीएन लोकमतचं एवढंच आव्हान आहे, की तुम्ही फिरायला गेलात तरी तुमचे कुटुंबीय तुमची वाट बघत असतात.समुद्राचं आकर्षण टाळा आणि जीवाला जपा. समुद्राजवळ जाणार असाल तर दारू पिणं टाळा.आणीबाणीची परिस्थिती आली आणि दारू प्यायलेले असाल, तर संकटावर मात करणं शरीराला कठीण जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2017 02:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close