ट्रेकिंग बेतली जीवावर, डोंगरावरून कोसळून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरुन कोसळून दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 07:51 PM IST

ट्रेकिंग बेतली जीवावर, डोंगरावरून कोसळून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

बदलापूर, 23 जानेवारी : शाळेच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून कोसळून दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे.

पूर्वा गांगुर्डे असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर यात एक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बदलापुरातील कात्रप विद्यालयात शिकणाऱ्या 9 वी आणि 10 वीच्या स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प कात्रप भागातील डोंगरावर गेला होता.

सकाळी 7 च्या सुमारास या विद्यार्थ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. 8 वाजता डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यावर त्यांनी खाली उतरायला सुरुवात केली. मात्र, डोंगराच्या मध्यभागी उतारावर आल्यावर दोन विद्यार्थिनीचा तोल गेल्याने त्या घरंगळत खाली आल्या. यात पूर्वा आणि अपूर्वा या दोघी गंभीर जखमी झाल्या. या दोघींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचाराआधीच पूर्वाचा मृत्यू झाला. तर अपूर्वा यात जखमी झाली आहे.

Loading...

दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने पूर्वा राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. शाळेच्या निष्काळजीपणा याला जबाबदार आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.

======================================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...