नोट्स वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची रॅट किल खाऊन आत्महत्या

25 वर्षीय उच्चशिक्षित विद्यार्थिनीने अभ्यासासाठी वेळेवर नोट्स न मिळाल्यामुळे उंदीर मारण्याचे औषध (रॅट किल) प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे साळशिंगे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 12:33 PM IST

नोट्स वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची रॅट किल खाऊन आत्महत्या

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, 22 मे-  25 वर्षीय उच्चशिक्षित विद्यार्थिनीने अभ्यासासाठी वेळेवर नोट्स न मिळाल्यामुळे उंदीर मारण्याचे औषध (रॅट किल) प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे साळशिंगे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा.. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, बाळही दगावले

साळशिंगी येथील शुभांगी सीताराम सोनवणे ही तरुणी एका शाळेत कंत्राटी पद्धतीने इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून काम करीत होती. तसेच एम.ए.( इंग्रजी)चे शिक्षणही घेत होती. तिला अभ्यासासाठी वेळेवर नोट्स न मिळाल्यामुळे तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

तिच्या पश्चात आई व एक बहीण असून त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. शुभांगीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे बहीण व आईला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. शुभांगीच्या अकाली निधनामुळे आई व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Loading...

शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!

10 वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

आष्टी तालुक्यातील खिळद येथे ही घटना घडली आहे. सोळा वर्षीय आरती आजिनाथ गर्जे हिने आत्महत्येसारखं टोलचे पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकले नाही.

खिळद येथील आजिनाथ गर्जे हे पनवेल येथे चालक म्हणून काम करतात. खिळद येथे त्यांची पत्नी, तीन मुली राहतात. आरती ही तीन मुलींमध्ये थोरली होती. आरतीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. दुपारी आरतीची आई रुग्णालयात गेली होती. दोघी बहिणी बाहेर खेळत होत्या. या दरम्यान आरतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


VIDEO : विवेकवर भडकले अनुपम खेर, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...