शिक्षकांवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

शिक्षकांवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

दर्शन चौधरी,धनंजय आबनावे या दोन ज्यूनियर कॉलेजच्या शिक्षकांवर हल्ला झाला आहे. वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये या शिक्षकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

  • Share this:

पुणे,07 ऑक्टोबर: केस कापायला सांगितले म्हणून शिक्षकांवर हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यास लोणीकंद  पोलिसांनी अटक केली आहे. दोन शिक्षकांवर 11वीतल्या या विद्यार्थ्याने  कोयत्याने हल्ला केला होता. त्यानंतर  हा विद्यार्थी फरार झाला होता.

जोगेश्वरी माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई इथे ही घटना घडली होती. या शाळेतला हा  विद्यार्थी अत्यंत खोडकर होता. तसंच तो शिक्षकांना जुमानत नव्हता. त्याला शिक्षकांनी ताकीद  दिली होती. तसंच त्याला त्यांनी केस कापून यायलाही सांगितलं होतं. त्यानंतर  या विद्यार्थ्याने या दोन शिक्षकांवर हल्ला केला.

दर्शन चौधरी,धनंजय आबनावे या दोन ज्यूनियर कॉलेजच्या शिक्षकांवर त्याने हल्ला केला होता. वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये या शिक्षकांवर  सध्या  उपचार सुरू आहेत.

या प्रकरणामुळे परिसरात खळबल माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 12:20 PM IST

ताज्या बातम्या