News18 Lokmat

लक्ष्मीदर्शन थांबवा तरच ठिबक लोकांपर्यंत पोहचेल, गडकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला

ठिबक सिंचन कंपन्या 20 रुपयांची वस्तू 40 रुपयांना विकतात.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2017 08:16 PM IST

लक्ष्मीदर्शन थांबवा तरच ठिबक लोकांपर्यंत पोहचेल, गडकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला

16 डिसेंबर : ठिबक सिंचन योजनेत लक्ष्मीदर्शन थांबवा तरच योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं असं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा वर्ल्ड आँरेंज फेस्टिव्हलचे लोकमतच्य़ा वतीने नागपुरात मोठ्या थाटात शुभारंभ झाला.  संत्रा उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया उद्योगासंदर्भात सरकार स्तरावर जोमाने काम करण्याचा निर्धार या फेस्टिव्हलच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी बोलत असताना नितीन गडकरी यांनी ठिबक सिंचन योजनेती गैरव्यवहाराचे वाभाडे काढले.

केंद्र सरकारकडून जो पैसा मिळतोय तो असाच मिळत नाही. ठिबक सिंचन कंपन्या 20 रुपयांची वस्तू 40 रुपयांना विकतात.  त्यामुळे या योजनेमध्ये इतके लोकं लक्ष्मीदर्शन घेत असतात. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष्मीदर्शन बंद करा असा टोला गडकरींना लगावला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री उपस्थित होते.

तसंच या योजनेला बँकेशी जोडले तर याचा पैसा शेतकऱ्यांना मिळेल आणि गैरव्यवहारही थांबले असा सल्लाही गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...