News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू
  • VIDEO: नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 09:24 AM IST | Updated On: Jul 13, 2019 09:24 AM IST

    नाशिक, 13 जुलै: नाशिक पुणे महामार्गाचे चौपदरीकरण करताना संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे असलेला अवघड घाट सुकर करण्यासाठी मोठाले डोंगर फोडून चारपदरी रस्ता तयार केला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सर्वात नयनरम्य दिसणारा हा चंदनापूरी घाट गेल्या काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. वारंवार या डोंगरावरून दगड महामार्गावर कोसळत असतात मात्र शुक्रवारी मध्यरात्री मोठी दरड संरक्षण जाळ्यासह महामार्गावर कोसळली. सुदैवाने यावेळी कोणतंही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. दोन दिवसापासून याठिकाणी दगड कोसळत होते मात्र मध्यरात्री ही एवढी मोठी दरड कोसळली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी