विदर्भामध्ये धरणं भरण्यासाठी आणखी पावसाची अपेक्षा

विदर्भामध्ये धरणं भरण्यासाठी आणखी पावसाची अपेक्षा

विदर्भात गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरणांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. विदर्भातील धरणांमध्ये सरासरी 50 टक्के पाणीसाठा आहे. ऑगस्ट संपायला आला तरी विदर्भातील एकाही नदीला पूर आलेला नाही

  • Share this:

24 ऑगस्ट: गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे विदर्भातील जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे विर्दभातील परिस्थिती सुधारली असली तरी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही.

विदर्भात गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरणांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. विदर्भातील धरणांमध्ये सरासरी 50 टक्के पाणीसाठा आहे. ऑगस्ट संपायला आला तरी विदर्भातील एकाही नदीला पूर आलेला नाही. प्रचंड पावसामुळे लहान, मोठ्या व मध्यम धरणांमधून होणारा पाण्याचा निचराही झालेला नाही.

विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. याठिकाणी नद्यांचे जाळेही मोठे आहे. मध्य प्रदेशात अधिक पाऊस झाला तरीही इथपर्यंत पाणी येते. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांना येणाऱ्या पुरामागे मध्य प्रदेशातील पाऊस कारणीभूत आहे. यावर्षी मात्र या नद्यांमध्ये पाणीसाठा अतिशय कमी आहे. कारण मध्य प्रदेशातसुद्धा पावसाचे प्रमाण कमी आहे. वैनगंगा, वर्धा या नद्यांना दरवर्षी पूर येतो, पण यावर्षी या नद्यांमध्ये जलसाठा कमी आहे. मागील १५ दिवसांत थोडा पाऊस झाला तेव्हा या नद्यांमध्ये थोडाफार जलसाठा वाढला आहे.

तर दुसरीकडे मराठवाड्यासोबतच नाशिक नगरमध्ये बरसलेल्या पावसामुळं मराठवाड्याला फायदा झालाय. मराठवाड्याचं सगळ्यात मोठ आणि महत्वाचं धरण असलेल्या जायकवाडीमध्ये पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. सध्या जायकवाडी धरणात जीवंत पाणीसाठा 62.50 टक्के तर मृतपाणी साठा 25 टक्के इतका आहे. आता परतीच्या पाऊस चांगला झाल्यस जायकवाडी धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 10:24 AM IST

ताज्या बातम्या