दीपक केसरकर साईदर्शनाला...समाधानकारक पावसासाठी घातलं साकडं

जिल्हा मोठा असल्यानं गुन्हेगारीत वाढ झाली असून या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 04:11 PM IST

दीपक केसरकर साईदर्शनाला...समाधानकारक पावसासाठी घातलं साकडं

शिर्डी, 1 जून- राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज साईदर्शनाला शिर्डीत आले होते. त्यांनी पहाटेची काकड आरती आणि दुपारच्या माध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली. राज्यात यावेळी समाधानकारक पाऊस व्हावा, साईचरणी प्रार्थना केल्याचे केसरकरांनी सांगितले. कुठलंही खातं लहान किंवा मोठं नसतं. आपल्याला मिळालेल्या खात्यात स्वतःच्या कामाचा ठसा कसा उमटवायचा हे महत्त्वाचं असतं. महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं खात असल्याचं दीपक केसरकर यांनी शिर्डीत सांगितलं.

दीपक केसरकर म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा ही वस्तुस्थिती आहे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्हा विभाजन होणं गरजेचं आहे. जिल्हा मोठा असल्यानं गुन्हेगारीत वाढ झाली असून या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.

शिवसेनेला केंद्रात एकच मंत्रिपद दिल्याने शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, जे खातं दिलं आहे. त्यात चांगलं काम करून आपला ठसा उमटवणे महत्वाचं असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक मंत्रिपद शिवसेनेला मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय.

झिरो क्राईम सिटी भर...

आगामी बजेटमध्ये शिर्डी झिरो क्राईम सिटी करण्यावर भर देणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री यासाठी मदत करतील अशी अपेक्षाही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Loading...

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा जोर पकडलाय. मंत्रिमंडळातल्या काही जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे असंतुष्टांना गाजर दाखविण्यासाठी अशी खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जातंय. मात्र आता लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर अधिवेशनापूर्वी हा विस्तार नक्की समजण्यात येतो.

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काही मंत्रिपदं ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात मंत्रिपद मिळालं तरी काम करण्यासाठी जेमतेम चार महिनेच मिळण्याची शक्यता आहे.


VIDEO: उकाड्यानं हैराण झालेल्या दिलासा, गडचिरोलीत वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...