व्हॅट की दरोडा? राज्यात पेट्रोल तीन रुपयांनी महागलं

व्हॅट की दरोडा? राज्यात पेट्रोल तीन रुपयांनी महागलं

  • Share this:

21 एप्रिल :  पेट्रोलच्या दरावाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. राज्य सरकारने काल (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात तीन रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

राज्य सरकार आतापर्यंत पेट्रोलवर 6 रुपये  व्हॅट लावत होता. पण आता हा व्हॅट 9 रुपये करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरात पेट्रोलच्या दरात 3 रुपये वाढ होत आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी जारी केली.

महामार्गांवरील दारू बंद झाल्याने सरकारचा मोठा महसूल बुडत असल्याचा दावा केला जातोय. तोच भूरदंड वसुल करण्यासाठी, हा 3 रूपयांचा व्हॅट लावण्याची घोषणा केली जातेय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे देशात सर्वात महाग पेट्रोल आता महाराष्ट्रात विकलं जाणार आहे.

 पेट्रोलचे दर

मुंबई

आधी - 74.72

आता - 77.42

पुणे

आधी - 73.08

आता - 76.08

ठाणे

आधी - 73.53

आता - 76.53

औरंगाबाद

आधी -  69.55

आता -  72.55

कोल्हापूर

आधी - 73.64

आता - 76.64

रत्नागिरी

आधी - 74.21

आता - 77.23

सोलापूर

आधी - 74.29

आता -  77.29

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 09:28 AM IST

ताज्या बातम्या