26 नोव्हेंबर : पद्मावती सिनेमाला होणारा वाढता विरोध पाहाता राज्य सरकार महाराष्ट्रात सिनेमावर बंदी घालू शकतं असे संकेत मिळताहेत. तसं सुतोवाच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. महाराष्ट्रात पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची राजपूत समाजाकडून मागणी होतीय.
राजपूत समाजाच्या विविध संघटनांनी आज नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली. यात त्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली. तेव्हा सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संगितलं.
दरम्यान उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये पद्मावती सिनेमावर बंदी घातली गेलीय. पद्मावती 1 डिसेंबरला रिलीज होणार होता. पण त्याला होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे सिनेमा कधी आणि कुठे रिलीज होणार, याबद्दल शंका निर्माण झालीय.
एकीकडे दीपिका पदुकोणलाही धमक्या येतायत. तरीही ती आणि टीम सिनेमाचं प्रमोशन करतेच आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा