S M L

राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीची आकडेवारी अंदाजेच !

सरकार 34 हजार कोटींची कर्जमाफी आणि 89 लाख लाभार्थी शेतकरी अशी जी आकडेवारी सांगत होतं. ती आकडेवारी सरकार अंदाजे सांगत होतं अशी कबुलीच सरकारनं दिलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 09:07 PM IST

राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीची आकडेवारी अंदाजेच !

25 जुलै : देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी असा डांगोरा पिटणारं सरकार तोंडघशी पडलंय. सरकार 34 हजार कोटींची कर्जमाफी आणि 89 लाख लाभार्थी शेतकरी अशी जी आकडेवारी सांगत होतं. ती आकडेवारी सरकार अंदाजे सांगत होतं अशी कबुलीच सरकारनं दिलीये.

विधिमंडळात आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केलं.

मागे दिलेल्या आकडेवारी वरून सरकार तोंडघशी पडले आहे. आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकारने हे स्पष्ट केले की कर्जमाफीचा फायदा मिळणारे 89 लाख शेतकरी आणि 34 हजार 200 कोटी हे आकडे अंदाजे वर्तवण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या कर्जमाफीच्या विषयावर आज SLBC ची मुंबईमध्ये बैठक झाली, थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज याबाबत अद्याप RBI ने परवानगीच दिलेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे विधिमंडळात ढोल बढवले जात आहेत. मात्र बँकिंग समितीकडून यायची असलेली नेमकी आकडेवारी आणि RBI ची NPA मध्ये आलेले कर्जदार यांना कर्जमाफी देण्यास परवानगी या विषयावर अद्याप काही निर्णयच झालेला नाही, अनेक सतातधारी सदस्यांनी बँका घोटाळे लपवण्यासाठी खरी माहिती देत नसल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे सरकार जी आकडेवारी सांगतंय ती आकडेवारी आणली कुठून असा सवाल विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 09:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close