राज्यातल्या 72 हजार पदांसाठी मेगाभरती सुरू होणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी ही मेगाभरती होणार असून त्याचा हजारो युवकांना फायदा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2018 09:26 PM IST

राज्यातल्या 72 हजार पदांसाठी मेगाभरती सुरू होणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई , 30 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषीत केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती.


मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना अशी भरती का करण्यात येत आहे असा सवाल विरोधी पक्षांसह विविध संघटनांनी विचारला होता. त्यावर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून इतर पदांसाठी भरती आहे असा सरकारचा युक्तिवाद होता. मात्र जास्त विरोध झाल्याने शेवटी सरकारला हा निर्णयच स्थगित करावा लागला. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने सरकारने ही मोठी घोषणा केली.


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

Loading...


मी जर सगळी आणि तुलनात्मक आकडेवारी समोर ठेवली तर 15 वर्षांपेक्षा जास्त चांगला कारभार आमच्या सरकारने केला आहे.


प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख 82 हजार 528 घरं पूर्ण केली, याआधी सव्वा दोन लाख घरं पूर्ण केली आणि अनुदान 90 हजाराहून दिड लाख करण्यात आलं.


अडीच लाख नागरिकांचा घरांचा गृह प्रवेश पंतप्रधानांच्या हस्ते झाला आहे.


साडे 10 लाख ग्रामीण भागातल्या लोकांना 2019 पर्यंत घरं देणार


देशातील इतर राज्याच्या तुलनेत स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे.


1 लाख 80 हजार कोटी महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक झाली


औद्योगिक गुंतवणूक 1 लाख 64 हजार 564 कोटी


मागच्या सरकारची तीन वर्षांची थकलेली ओबीसींची शिष्यवृत्ती आम्ही दिली. आता आम्ही डीबीटी पद्धत सुरू केली ज्यामध्ये थेट खात्यात पैसे जमा होतात.


सर्व प्रोजेक्ट्सची संकल्पना काँग्रेसच्या काळातली होती ती आम्ही सुरू केली. 15 वर्षात तुम्ही काहीही सुरू करू शकला नाही.


258 किमीचं मेट्रोचं जाळं मुंबईत करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली


कोस्टल रोडची संकल्पना पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातली पण एक फुटकी परवानगी ते आणू शकले नाहीत. मी स्वतः दिल्लीला जाऊन सर्व परवानग्या आणल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...