News18 Lokmat

राज्यात दंगली घडाव्यात हेच सरकारला हवंय-प्रकाश आंबेडकर

आज राज्यात कायद्याचा धाक ठेवला जात नाहीये. आणि हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलं जातंय. दंगली घडवल्या जात आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2018 06:16 PM IST

राज्यात दंगली घडाव्यात हेच सरकारला हवंय-प्रकाश आंबेडकर

मुंबई, 15 जून : जसा राजा तशी प्रजा...जे राज्य सरकार वागतंय तसं प्रजा अनुकरण करतेय. त्यामुळे एक गट हा समाजात वर्चस्व निर्माण करण्यासाठी अत्याचाराचा अवलंब करत आहे. त्यातूनच या दोन मुलांना मारहाण झालीये अशी घणाघाती टीका भारीप संघटनेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. तसंच भाजपलाच राज्यात दंगली घडवून आणायच्या आहे असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला.

जळगाव येथील जामनेर तालुक्यात विहिरीवर पोहण्याच्या कारणावरून दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेवर प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना भाजप आणि संघावर सडकून टीका केली.

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

भाजप आणि संघ जाणीवपूर्वक असं वागत आहे. समाजात एक वर्चस्ववादी व्यवस्था होती त्यातील हा घटक समाजावर काम करत आहे. अशा गटाला प्रोत्साहीत करण्यासाठी भाजप आणि संघ काम करत आहे. यात काही समाजाला सरकार उचकावण्याचं काम करत आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित

Loading...

जसा राजा वागतोय तशी प्रजा ही वागतेय. या सरकारचं पाहूनच प्रजा त्याचं अनुकरण करतेय. हे सरकार जातीयवादी आहे. त्यामुळे एक गट हा समाजात वर्चस्व निर्माण करण्यासाठी अत्याचाराचा अवलंब करत आहे. त्यातूनच या दोन मुलांना मारहाण झालीये असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

हे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी

आज राज्यात कायद्याचा धाक ठेवला जात नाहीये.  आणि हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलं जातंय. दंगली घडवल्या जात आहे. दंगली घडल्या तर समाजात अराजकता निर्माण होईल आणि हेच सरकारला हवंय आहे. यातून सरकारला आणीबाणी आणण्याची संधी मिळतेय, ही आणीबाणीकडे वाटचाल आहे आणि हे जनतेनं लक्षात घ्यावं असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पत्नीकडून 10 हजार रुपये उधार घेऊन उभारली 2.7 लाख कोटींची कंपनी !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...