अंत्योदय योजनेत राज्य सरकारची ढवळाढवळ,लाभार्थ्यांना मिळणार ५ ते १० किलो धान्य

अंत्योदय योजनेत राज्य सरकारची ढवळाढवळ,लाभार्थ्यांना मिळणार ५ ते १० किलो धान्य

अंत्योदय योजनेतून महिन्याला ३५ किलो धान्य देण्याऐवजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार फक्त पाच ते दहा किलो धान्य देण्याचा निर्णय राज्य अन्नपुरवठा विभागाने घेतला आहे

  • Share this:

27 नोव्हेंबर : एक किंवा दोन जणांच्या कुटुंबाला अंत्योदय योजनेतून महिन्याला ३५ किलो धान्य देण्याऐवजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार फक्त पाच ते दहा किलो धान्य देण्याचा निर्णय राज्य अन्नपुरवठा विभागाने घेतला आहे. धान्य खुल्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून घेण्यात आलेला हा निर्णयावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या परिपत्रकानुसार अंत्योदय योजनेचे लाभार्थी योजनेतून कमी करण्यात आले असून त्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केले आहे. या बदलामुळे संबंधित कुटुंबांना आधी प्रतिमहिना मिळणारे ३५ किलो धान्य कमी झाले आहे. राज्यात लाखो आदिवासी, गरीब, कोलाम, पारधी, दलित, अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना उपरोक्त योजनेतून कमी करून त्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केल्यामुळे याचा फटका वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा या सर्वांना बसला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अत्यंत गरीब, वंचित वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा, आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.  भुकेलेल्यांना अन्नापासून वंचित ठेवणार्‍या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

तसंच  ही योजना केंद्राची असल्यामुळे यामध्ये राज्य सरकारने केंद्राची कोणतीही सूचना नसताना तसंच अन्नपुरवठा विभागाने आपल्या विभागीय आणि जिल्हास्तर अधिकार्‍यांचा सल्ला केराच्या टोपलीत टाकत हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही  तिवारी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 10:41 AM IST

ताज्या बातम्या