S M L

राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

तब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 07:26 PM IST

राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

मुंबई, 06 आॅगस्ट :  तब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढचे 3 दिवस मंत्रालयातला कारभार ठप्प राहणार असल्याचं कळतंय. तसंच सरकारी शाळा, रूग्णालंय आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयांच्या कामकाजावरही या संपाचा विपरीत परिणाम होणार आहे.

विविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान संप पुकारलाय. शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली.

सातव्या वेतन आयोगाची जानेवारी -2019 पासून अंमलबजावणी करण्याचा आणि 4 हजार कोटींची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र सरकारनं थकीत महागाई भत्त्याच्या स्वरूपात 10 हजार कोटी मंजूर करण्याची मागणी करत संपाचं हत्यार उपसलंय. तसंच नोकरभरतीवरची स्थगिती उठवण्यात यावी ही देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.आज मुंबईत संघटनेची समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत  ७ ते ९ आॅगस्ट संप करण्याचा निर्धार केलाय  या संघटनाचे राज्यात ३ आणि ४ श्रेणीचे सुमारे १९ लाख कर्मचारी आहेत. मुख्यमंत्री यांना राज्य सरकारी कर्मचारी विषयी घेतलेल्या निर्णयावर खुश नाही. संघटना म्हणून संप करण्याची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी यांनी संघटना समवेत बैठक घेतली त्यात जानेवारीपासून फरक देण्याची भूमिका घेतली त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रूपये देण्याचं सांगितलं पण संघटना म्हणणे आहे की, मुळात दहा हजार कोटी तरतूद असताना ती कमी का केली, त्यात नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणे चुकीच आहे.

उद्या कोणत्या सेवा ठप्प ?

- शासकीय शाळा (महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका शाळा)

Loading...

- मंत्रालय

- महापालिका

- जिल्हा परिषद कार्यालय

- नगरपालिका कार्यालय

- तलाठी कार्यालय

- सरकारी रुग्णालये

संपात कोण सहभागी होणार ?

- सगळ्या शासकीय शाळांमधले कर्मचारी

- रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी

- राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटना

- कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय, मुंबई

------------------------------------------------------------

हेही वाचा

VIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण

शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप

VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 07:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close