News18 Lokmat

सावजी मटणासोबत दारु पडली महागात.. नागपुरात १२५ पेक्षा जास्त तळीरामांवर गुन्हे

मटण खवैय्यांची नागपूरच्या सावजी मटणाला पहिली पसंती असते. सावजीच्या मटणावर ताव मारताना मद्याचा एक दोन पेग रिचवण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 06:03 PM IST

सावजी मटणासोबत दारु पडली महागात.. नागपुरात १२५ पेक्षा जास्त तळीरामांवर गुन्हे

हर्षल महाजन(प्रतिनिधी)

नागपूर, 26 एप्रिल- नागपुरचं सावजी मटण प्रसिद्ध आहे. पण, सावजी भोजनालयात मटणासोबत दारु पिने अनेकांना चांगलंच महागात पडलंय. एकट्या नागपूर जिल्ह्यात सावजी मटणासोबत दारु पिणाऱ्या १२५ पेक्षा जास्त तळीरामांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.  या कारवाईमुळे सावजी भोजनालयात मटणासोबत विनापरवाणा दारु पिणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मटण खवैय्यांची नागपूरच्या सावजी मटणाला पहिली पसंती असते. सावजीच्या मटणावर ताव मारताना मद्याचा एक दोन पेग रिचवण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज अनेक सावजी भोजनालयात अशा मेजवाण्या रंगत आहेत. पण सावजी भोजनालयात दारु पिने बेकायदा आहे. त्यामुळेच उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे.

सावजीत मटणासोबत दारु पिणाऱ्यांचे धाबे दणाणले..

नागपूर जिल्हायात नोव्हेंबर २०१८ पासून २२५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेय, त्यामुळेच अशा तडीरामांचे चांगलेच धाबे दणाणलेय. धाबे दणाणलेले मद्यपी आता दारुच्या परमिटसाठी अर्ज करत आहेत.

Loading...

काय म्हणतात अधिकारी..?

नागपूर जिल्ह्यात सातशेपेक्षा जास्त सावजी भोजनालय आहेत. शहराबाहेर किंवा शहरतील काही सावजी भोजनालयात दारु पिण्याची सोय करु दिलेली असते. पण हा प्रकार बेकायदा आहे. शिवाय यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीलाही चालना मिळते. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केलीय. पण ही कारवाई थांबली की पुन्हा बऱ्याच सावजी भोजनालयात विनापरवाना दारु अड्डे भरायला सुरुवात होतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या कारवाईची नियमित गरज व्यक्त केली जात आहे.

-रावसाहेब कोरे (उप निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग)

नोव्हेंबर २०१८ ते आजपर्यंतची कारवाई

- १२५ ठिकाणी गुन्हे दाखल

-१४७ दारु पिणाऱ्यांवर कारवाई

-१२२ मद्यपींवर न्यायालयाचा दंड


VIDEO : सुजयच्या जागेबद्दल खरगेंचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...