मुंबई, 28 फेब्रुवारी : भारताने पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत दहशतावादी घातपात घडवण्याची शक्यता असल्याने गुप्तचर संस्थांनी राज्यात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपवण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.