12 डिसेंबर: आज विधानसभेत पुन्हा विरोधकांनी सरकारला घेरला आहे. शेतकरी प्रश्नावर विरोध करत असतानाच विरोधक व्हेलमध्ये उतरले. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
विरोधी पक्षांच विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे नागपूरमध्ये आज विरोधकांचे दोन स्वतंत्र मोर्चे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसच्या मोर्च्याचे नेतृत्व अशोक चव्हाण करत आहेत कर्जमाफी आणि बोंड अळीच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमीपासून सुरू होईल. राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे नॅशनल कॉलेजपासून सुरू होईल.
एकंदर विधिमंडळात आणि बाहेर दोन्हीकडे सरकारला घेरायचे विरोधकांनी ठरवलं आहे.तेव्हा आता या अधिवेशनात 19 विधेयकं सरकार कसं पार करतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा