S M L

एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

ऐन दिवाळीच्या तोंडावर संप करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सरकारच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 19, 2018 09:05 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

19 जानेवारी:  . ऐन दिवाळीच्या तोंडावर संप करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सरकारच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसण्याची तयारी दर्शवली आहे. दिवाळीतल्या संपानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यात उच्चस्तरीय समितीनं देऊ केलेली वेतनवाढ त्यांनी अमान्य केली आहे. या समितीच्या प्रस्तावाची होळी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच ही वेतनवाढ अमान्य असल्यानं त्याबाबत हायकोर्टात बाजू मांडणार असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनानं दखल घेतली नाही तर संपावर जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दिवाळीच्या संपाच्या काळात उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशाने उच्चस्तरीय स्थापन करण्यात आली होती. उच्चस्तारिय समितीने देऊ केलेली वेतनवाढ कामगारांना मान्य नाही.

आज कामगारांच्या कृती समितीची बैठक झाली होती. त्यामध्ये पुन्हा संप करण्याआधी 29 जानेवारीच्या सुनावणीत अमान्य वेतनवाढीबाबत न्यायालयासमोर बाजू मांडणार असल्याचं नक्की झालं. त्याआधी समितीच्या प्रस्तावाची होळी करणे आदी कार्यक्रम घेतले

Loading...

जाणार आहेत. प्रशासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यास संप अटळ असेल असा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 07:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close