दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संपामुळे एसटीचं इतक्या कोटींचं नुकसान

दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संपामुळे एसटीचं इतक्या कोटींचं नुकसान

राज्यात एसटी कर्मचा-यांनी अचानक काल कामबंद आंदोलन सुरू केलं. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय.

  • Share this:

मुंबई, 09 जून : राज्यात एसटी कर्मचा-यांनी अचानक काल कामबंद आंदोलन सुरू केलं. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय. 1 जून रोजी घोषित केलेली वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसेल तर ती रद्द करण्यासंदर्भात विचार सुरु अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

पगारवाढीबाबत प्रकरण औद्योगिक न्यायालयात प्रलंबीत आहे. न्यायालय जो निर्णय घेईल तो कर्मचाऱ्यांनी मान्य करावा. इंधन दरवाढ रद्द झाली तर एसटीची संभाव्य भाडेवाढ देखील कमी करणे शक्य होईल. असा प्रस्ताव दिवाकर रावते यांच्याकडे एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दिवाकर रावते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पण या सगळ्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कर्मचारीच नसल्यानं अनेक ठिकाणच्या एसटी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

तर, पनवेलमध्ये देखील या संपाचा परिणाम पहायला मिळाला असून 60 टक्के एसटी वाहतूक ही पनवेल मध्ये बंद ठेवण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेली पगारवाढ ही फुगवी आणि फसवी असून याविरोधात हा संप पुकारण्यात आल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

लालपरी संपाचा परिणाम (काल दिवसभराची आकडेवारी)

- एसटीचा १५ कोटी रुपयाचं महसूल बुडाला

- ८० आगारातून एकही रा.प. बस सुटली नाही

- २५० आगारातून सुमारे ३० % बसफेऱ्या सुटल्या

- १४५ आगारामध्ये अंशतः वाहतूक

- राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 09:26 AM IST

ताज्या बातम्या