जीएसटीमुळे एसटी 'स्वस्त' तर रेल्वेचा एसी प्रवास महागणार

जीएसटीमुळे एसटी 'स्वस्त' तर रेल्वेचा एसी प्रवास महागणार

एसटी महामंडळाकडून एसी बसप्रवासासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवाकराच्या तुलनेत जीएसटी कमी असल्याने या तिकिटात घट होणार आहे.

  • Share this:

1 जुलै : जीएसटी (वस्तू व सेवाकर) करप्रणाली लागू झाल्यानंतरचा परिणाम म्हणून लोकलमधील फर्स्ट क्लास, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील एसी प्रवास यासाठी होणाऱ्या खर्चात काही प्रमाणात वाढ होणार आहे. मात्र, एसटीची एसी सेवा जीएसटीमुळे काहीशी स्वस्त होणार आहे.

एसटी महामंडळाकडून एसी बसप्रवासासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवाकराच्या तुलनेत जीएसटी कमी असल्याने या तिकिटात घट होणार आहे. नव्याने लागू होणारा जीएसटी पाच टक्के असल्याने शिवनेरी आणि शिवशाहीचे एसी ​तिकीट पाच ते सात रुपयांनी कमी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 12:18 PM IST

ताज्या बातम्या