भाटघर धरणाजवळ STच्या बसला अपघात, खिडकीची काच फोडून 30 प्रवाशांना वाचवलं

अवघड वाटचाल करत असतानाच ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बसने पलटी घेतली.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 03:22 PM IST

भाटघर धरणाजवळ STच्या बसला अपघात, खिडकीची काच फोडून 30 प्रवाशांना वाचवलं

बाळासाहेब काळे, पुरंदर 1 ऑगस्ट : पुरंदर परिसरातल्या भाटघर धरणाजवळ आज एसटीच्या बसला अपघात झाला. संततधार पाऊस त्यामुळे कुंद झालेलं वातावरण आणि निसरडे रस्ते यामुळे गाडी चालवणं अवघड जात होतं. अशी अवघड वाटचाल करत असतानाच ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बसने पलटी घेतली. यावेळी बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यातले 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आलंय.

तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वी एक्स बॉयफ्रेंडनं घेतला 'ती'चा जीव

ही बस भोरहून पुण्याकडे जात होती. पाऊस असल्याने गाडीचा वेग जास्त नव्हता. मात्र एका वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि बसने पलटी घेतली. बस रस्त्याच्या कडेला जाऊन आडवी पडली. सुदैवाने बाजूला जास्त खोलगट भाग नसल्याने मोठा अनर्थ टळला. पलटलेली बस चिखलात जाऊन पडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, तारीखही ठरली!

बस पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटल्याने रस्ता मोकळा होता आणि त्यावरून वाहतूकही सुरू होती. त्यामुळे लोकांनी थांबून मदतकार्यात सहभाग घेतला. गाडीचा दरवाजा खालच्या बाजूला दबल्याने सर्व प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून वाचविण्यात आलं. या अपघातात 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नंतर दुसऱ्या एका बसने जखमी आणि इतर सर्व प्रवाशांना भोरला सोडण्यात आलं आणि जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर येथे उपचारासाठी भरती करण्यात आलं.

Loading...

विटांनी ठेचून पत्नीची हत्या, 4 महिन्यांची चिमुकली रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी

पावसाळ्यात सर्व चालकांना बसेस चालविताना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था चांगली नाही. पावसामुळे रस्त्यांवर खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या जास्त असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...