आॅल द बेस्ट !, उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 05:12 PM IST

आॅल द बेस्ट !, उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

12 जून :  राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे.  मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने उशीरा लागला. त्यामुळे  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळय़ा तारखा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली.  मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल 6 जूनला लागला होता. पण यावर्षी निकालाला सहा दिवस उशीर झालाय.

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

www.mahresult.nic.in

http://result.mkcl.org

Loading...

mh-ssc.ac.in

http://m.rediff.com/exam_results

(सविस्तर बातमी लवकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...