News18 Lokmat

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत या निकालांकडेही ठेवा लक्ष

लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर 10 वी आणि 12 वी चे निकालही जाहीर होणार आहेत. या निकालांबद्दलची उत्सुकताही ताणली गेली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:58 PM IST

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत या निकालांकडेही ठेवा लक्ष

मुंबई, 21 मे : लोकसभा निवडणुकांच्या निकालांआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल 23 मे ला आहेत पण त्याआधीच वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या निकालांच्या धामधुमीत आणखी एका निकालांचीही चर्चा आहे. याबद्दलची उत्सुकताही आता ताणली गेली आहे. ती म्हणजे 10 आणि 12 वी च्या निकालांची.

लोकसभेच्या निवडणुकांनंतर 10 वी आणि 12 वीचे निकाल लागू शकतात, अशी माहिती आहे.

12 वी चे निकाल मे महिन्याच्या अखेरीस

12 वीच्या परीक्षेचे निकाल मे महिन्याच्या अखेरीला लागण्याची शक्यता आहे.

10 वी चे निकाल जूनमध्ये

Loading...

10 वीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील,असं सांगितलं जात आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल mahresult.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.

गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता.

अधिकृत वेबसाइटवर निकाल

मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे सगळ्यांनाच या निकालाचे वेध लागले आहेत. 10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर हे निकाल पाहू शकतात.

HSC, SSC चे विद्यार्थी MSBSHSE बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

राज्यात 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली.

==============================================================

VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...