सहा महिन्यातच 'वंचित'मध्ये फूट, बंडखोरांनी स्थापन केला नवा पक्ष

'भाजपसाठीच प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी काम करते. लोकसभेची चूक विधानसभेत करणार नाही.'

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 04:06 PM IST

सहा महिन्यातच 'वंचित'मध्ये फूट, बंडखोरांनी स्थापन केला नवा पक्ष

मुंबई 25 जुलै : भाजपला हरविण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीत सहा महिन्यांमध्येच फुट पडलीय. वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलीय. 'महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी' असं या पक्षाचं नाव असणार आहे. डावी आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी हा पक्ष हातमिळवणी करणार असल्याची घोषणा लक्ष्मण माने यांनी केलीय. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील 'वंचित'मुळे भाजप आणि शिवसेनेचाच फायदा झाला असा आरोपही त्यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.

राष्ट्रवादीसाठी सकारात्मक घडामोड, अमोल कोल्हेंनी दिला 'हा' शब्द

माने म्हणाले, अनेक आंबेडकरी संघटना, पक्ष आमच्या सोबत येणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी हा पक्ष डाव्या आघाडी बरोबर जाणार आल्याचंही माने यांनी सांगितलं. भाजप शिवसेनेला  हरविण्यासाठी हा नवा पक्ष असून वंचित बहुजन आघाडी मुळे युतीचा लोकसभेत मोठा फायदा झाला. ही चूक लक्षात आल्यानंच नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपसाठीच वंचित आघाडी काम करत असल्याचा आरोपही माने यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांशी चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीतली चूक आता करायची नाही असंही त्यांनी सांगितलं.

राजीव गांधी हत्याकांड : 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोषी नलिनी आली कारागृहाबाहेर

Loading...

आम्ही जातीयवादी आणि धार्मिक संघटनांबरोबर जाणार नाही, किरकोळ स्वार्थासाठी बाबासाहेबांचा विचार सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. माने यांच्या या नव्या पक्षात माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटीलही सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितला लाखा लाखांची मतं पडली होती. त्यामुळे काँग्रेसला 6 ते 7 जागांवर फटका बसला असं स्पष्ट झालं होतं.

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

त्यानंतर माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अंजरिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अंजरिया यांनी माने यांच्याविरोधात 35 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितलं म्हटलं होतं. त्यावर बोलताना आपण अंजेरिया यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नव्हती त्यांच्या नोटिशीला वकीला मार्फत उत्तर देऊ असं उत्तर माने यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...