S M L

अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन

चंद्रपुर जिल्हयात..अड्याळ टेकडी ( ता.ब्रम्हपूरी ) श्रीगुरूदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. ते वय ९१ होते. उद्या सकाळी अड्याळ टेकडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 8, 2018 10:51 PM IST

अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन

अड्याळ टेकडी ( ता.ब्रम्हपूरी ) ता,08 एप्रिल : चंद्रपुर जिल्हयात..अड्याळ टेकडी ( ता.ब्रम्हपूरी ) श्रीगुरूदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं  आज  वृध्दापकाळाने निधन झालं. ते  वय ९१ होते. उद्या  सकाळी अड्याळ टेकडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९४४ साली ते राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर  राष्ट्रसंताच्या कार्यात  रमले. १९५६  सालच्या महाराजांच्या नाशिक दौऱ्यात  ते आठ दिवस भजन साथीला होते. पूज्य श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणेमुळे आपल्या शेती हिश्यासह ते अड्याळ टेकडी वर रमले ते शेवटच्या श्वासापर्यंत. श्रीतुकारामदादा गीताचार्य यांनी त्यांना ९ डिसेंबर १९८९ ला गीतांजयंती दिनी श्रीगुरूदेव तत्त्वज्ञानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. अड्याळ टेकडी वरून  ग्रामगीता  खेड्यापाड्यात रूजविण्यासाठी महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश , मध्यप्रदेश तसेच आदी भागात त्यांनी प्रचार दौरे केलेत. श्री तुकारामदादाच्या  प्रेरणेमुळे  ग्रामगीता प्रणित सक्षम ग्रामसभा ,व्यसनमुक्त समाजनिर्मिती ,आदर्श ग्राम रचना , ग्राम स्वराज्य ,सामुहिक विवाह सोहळा ,ग्रामसंरक्षण दल ,निसर्गोपचार ,स्वयंशासन ,अंधश्रध्दा निर्मुलन या विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी अखंड प्रवास केला. चंद्रपूर येथे ४व ५ जानेवारी २०१५ ला संपन्न झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते अध्यक्ष होते.त्यांनी अनेक पुस्तकाचे लेखन केलेले असून अड्याळ टेकडी वरून निघणारे ग्रामआरोग्य मासिक तथा सत्संग साप्ताहिकातूनही  लेखन केलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 10:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close