सरपंचपदाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्च मर्यादा

सरपंचपदाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्च मर्यादा

ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 आॅगस्ट : ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसंच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार आता सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उमेदवारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्चित केली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी संपूर्ण ग्रामपंचायत हे प्रचार क्षेत्र असेल. सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रूपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती असं सहारिया यांनी सांगितलं.

आता सदस्य संख्येनुसार बदल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसाठी खर्च मर्यादा (रुपये) ग्रामपंचायत सदस्य संख्या,सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी,सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी असा असणार आहे.

अशी आहे मर्यादा

7 - 9 सदस्य

25,000

50,000

11 - 13 सदस्य

35,000

1,00,000

15 - 17 सदस्य

50,000

1,75,000

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 11:46 PM IST

ताज्या बातम्या