पुणे वगळता राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर ओसरला

पुणे वगळता राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर ओसरला

कोकणात गेले दोन दिवस पाऊस चालू असलेल्या पावसाने उसंत घेतली आहे. तर रात्रभर मुंबईत कोसळणाऱ्या पावसानेही विश्रांती घेतली आहे.पुण्यात मात्र मुसळधार पाऊस पडतो आहे.पुणे शहरात मध्यवर्ती असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. टिळक पूल परिसरात पाणी साचलंय. राज्यात काही ठिकाणं वगळता बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे.

  • Share this:

20 सप्टेंबर: गेले दोन दिवस मुंबईसह महाराष्ट्रात चालू असलेला पाऊसाने थोडीशी उसंत घेतली आहे.पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे तर इतर ठिकाणी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती मिळते आहे.

कोकणात गेले दोन दिवस पाऊस चालू असलेल्या पावसाने उसंत घेतली आहे. तर रात्रभर मुंबईत कोसळणाऱ्या पावसानेही विश्रांती घेतली आहे.पुण्यात मात्र मुसळधार पाऊस पडतो आहे.पुणे शहरात मध्यवर्ती असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. टिळक पूल परिसरात पाणी साचलंय. खडकवासल्यातून  पाण्याचा विसर्ग होतो आहे. शहरात पार्क केलेल्या कारसुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत.

दरम्यान राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. कोल्हापूरच्या राधानगरी ,साताऱ्याच्या कोयना आणि नाशिकच्या 5 धरणांतूम पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  तर पुण्याजवळील चासकमान इथूनही भिमा नदीत पाणी सोडण्यात येतं आहे. उजनी आणि वीर धरणातूनही भीमा नदीमध्ये पाणी सोडलं असल्यामुळे भीमा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात   काही ठिकाणं वगळता बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे.

मुंबईत विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.लोकल काही मिनीटं उशीराने धावत असल्या तरी त्या वेळेवर धावू लागतील अशी  आशा  रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या