ख्रिसमसमध्ये गोव्याला जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पर्यटकांना दिलासा

या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळून रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 10:48 AM IST

ख्रिसमसमध्ये गोव्याला जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पर्यटकांना दिलासा

21 डिसेंबर : ख्रिसमसमुळे पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने आजपासून 1 जानेवारीपर्यंत विशेष गाड्या सोडण्याचं ठरवलं आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळून रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहेत. या सर्व गाड्या १४ डब्यांच्या असून त्यांना एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे ५ कोच, सेकण्ड स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे २ कोच असतील.

मुंबईहून करमाळीला जाण्यासाठी गाड्यांच वेळापत्रक

21 ते 28 डिसेंबर

02025 ही गाडी सीएसएमटी ते करमाळीपर्यंत

Loading...

वेळ - सीएसएमटीहून पहाटे 5 वा. सुटणार

दुपारी 1:20 वा. करमाळीला पोहचणार

 

23, 24, 30, 31 डिसेंबर

02027 ही गाडी सीएसएमटी ते करमाळीपर्यंत

वेळ - सीएसएमटीहून रात्री 12:40 वा. सुटणार

सकाळी 11 वा. करमाळीला पोहचणार

 

25 डिसेंबर ते 1 जानेवारी

02029 ही गाडी सीएसएमटी ते करमाळीपर्यंत

वेळ - सीएसएमटीहून रात्री 12:40 वा. सुटणार

सकाळी 11:30 वा. करमाळीला पोहचणार

 

करमाळीहून मुंबईला येण्यासाठी गाड्यांचं वेळापत्रक

21 ते 28 डिसेंबर

02026 ही गाडी करमाळी ते सीएसएमटीपर्यंत

वेळ - दुपारी 2:30 वा. करमाळीहून सुटणार

रात्री 11 वा. सीएसएमटीसा पोहचणार

 

23, 24, 30, 31 डिसेंबर

02028 ही गाडी करमाळी ते सीएसएमटीपर्यंत

वेळ - रात्री 12:40 वा. करमाळीहून सुटणार

सकाळी 11:50 वा. सीएसएमटीला पोहचणार

 

25 डिसेंबर ते 1 जानेवारी

02030 ही गाडी करमाळी ते सीएसएमटीपर्यंत

वेळ - दुपारी 2 वा. करमाळीहून सुटणार

रात्री 12:20 वा. सीएमएमटीला पोहचणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...