भिकाऱ्यांनी भरला तब्बल एक लाख रुपयांचा जामीन, पुण्यात भिकाऱ्यांची संघटीत टोळीचा संशय

भिकाऱ्यांनी भरला तब्बल एक लाख रुपयांचा जामीन, पुण्यात भिकाऱ्यांची संघटीत टोळीचा संशय

. बेगर होममधून सुटका करून घेण्यासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांचा जामीन भरून या पकडलेल्या भिकाऱ्यानी आपली सुटका करून घेतलीये.

  • Share this:

वैभव सोनवणे,पुणे    

11 नोव्हेंबर : मुंबई पाठोपाठ आता पुण्यात ही 'ट्रॅफिक सिग्नल' सिनेमाप्रमाणे संघटीत भीक मागण्याचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे. बेगर होममधून सुटका करून घेण्यासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांचा जामीन भरून या पकडलेल्या भिकाऱ्यानी आपली सुटका करून घेतलीये.

पुण्यात अचानक गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर भिकाऱ्यांची संख्या वाढलीये. मंदिर,चर्च आणि मशिदीच्या बाहेर या भिक्षेकऱ्यांचा मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

मंदिर, चर्च किंवा मशिदीबाहेर रांग करून भीक मागण्यासाठी बसण्याची मुंबईची स्टाईल पुण्यात ही पाहायला मिळतेय. वाढत्या तक्रारीमुळे कोंढवा पोलिसांनी तब्बल ५७ भिक्षेकऱ्याना पकडून गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केलं होतं.

त्यांना बेगर होममध्ये पाठवल्यानंतर आश्चर्य म्हणजे या भिकाऱ्यांपैकी २२ भिकाऱ्यांनी प्रत्येकी पाच ते सात हजार रुपयांचा जमीन दिलाय म्हणजे तब्बल सव्वा लाख रुपयांचा आणि वकिलाचा खर्च वेगळाच... भिकाऱ्यांच्या या चलाखी मुले पोलीस ही चक्रावलेत. हा सगळं प्रकार ट्राफिक सिग्नल सिनेमात दाखवलेल्या संघटित टोळ्यांचा व्यवसाय असल्याचा संशय पोलिसांना आहे

Loading...

काही स्वयंसेवी संस्थांनी याचा अभ्यास केल्यावर धक्कदायक माहिती समोर येतेय.. पकडण्यात आलेल्या काही भिकारी महिलांकडे छोटी मुलं होती ती त्यांची नसल्याचं लक्षात आलं. अटक केलेल्या महिला भिकाऱ्यांकडे असलेली लहान मुलं ही दुसऱ्याच महिलांची असल्याचं समोर आलं होतं. या लहान मुलांच्या माता या बेगर होम बाहेर पकडलेल्या भिकाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न करत असल्याचं ही समोर आलंय.

सर्वसामान्यपणे भिकारी स्वीकार केंद्रांमध्ये आणण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांना जामीन देण्यासाठी इतक्या तत्परतेने कुणी येत नसल्याचा अधीक्षकांचा अनुभव आहे पण यावेळेस लगेच जामीन मिळाल्याने त्यांनी ही आश्चर्य व्यक्त केलंय.

मोबाईलवर बोलणारे भिकारी हे तसं आता साधारण: चित्र दिसतं असलं तर भीक मागण्याच्या प्रवृत्तीला संघटीत व्यवसायाचं स्वरूप येन अत्यंत घातक आहे, ते तात्काळ थांबवणं आवश्यक आहे अन्यथा शोषणाचा आणखी एक सर्वांसमोर सुरू असून ही ना दिसणारा अंक सुरूच राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...