अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला

आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2017 10:30 PM IST

अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला

  सागर सुरवसे, सोलापूर

17 मे : आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

हातानं मैला उचलण्याचं काम सुरू आहे, ते अशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीमध्ये. इंदिरानगर वसाहतीमध्ये बळवंत कुचेकर आणि मच्छिंद्र जाधव हे सफाई कामगार हातानं सार्वजनीक शौचालयाच्या टाकीतला मैला काढतायेत.

हातानं मैला उचलणं म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन...मग मैला हातानं उचलण्याचे आदेश देणाऱ्या आरोग्य अधिकारी कचरे, ग्रामसेवक शिवाजी कदम आणि सीईओ माणिकराव इंगवले आदींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय.

ग्रामपंचायतीच्या नोकरीत असणाऱ्यांनाच हे काम करावं लागत असल्यानं,आता ही प्रथा बंद करण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करायला सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केलीय.

Loading...

एकीकडे आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत असल्याचे अभिमानाने सांगणाऱ्या अकलूजमध्ये दिव्याखाली अंधार अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे या अमानवी कृत्याची दखल प्रशासन घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...