बालाजी निरफळ (प्रतिनिधी)उस्मानाबाद, 18 मे: कर्करोग, मधुमेह सारखे गंभीर आजार होऊ नयेत म्हणून अन्नघटकांसोबत स्वदेशी आणि आयुर्वेदिक वस्तूंचा जीवनात जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे. यासाठी सतत आग्रही असणाऱ्या एका डॉक्टरांनी यंदा ऐन दुष्काळा आपल्या गावात हजारो देशी गायींचं संवर्धन कऱण्यासाठी मोठी चारा छावणी उघडली आहे. इथे ते भाकड गायींच्या शेण-गोमूत्रापासून दैनंदिन वापराच्या वस्तू कशा तयार करायच्या याचंही प्रशिक्षण देतात.