संसारापुढे हतबल शेतकरी, कवडीमोल भावाने विकतोय तूर !

संसारापुढे हतबल शेतकरी, कवडीमोल भावाने विकतोय तूर !

लग्नकार्य, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असल्यानं शेतकरी मिळेल त्या भावानं तूर विकायला निघालेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

27 एप्रिल : सरकार तूर खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरात तुरीचे ढीग आहेत. लग्नकार्य, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असल्यानं शेतकरी मिळेल त्या भावानं तूर विकायला निघालेत.

सरकार म्हणतं शेतकऱ्याच्या घरात तूरच राहिलेली नाही... कदाचित सत्तेच्या धुंदीमुळे सरकारला आणि मंत्र्यांना वस्तूस्थिती दिसत नाहीये. शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे हे असे ढिग लागलेत. ही तूर आहे नाफेडनं नाकारलेली. कचरा आहे, दाणा लहान आहे, तूर ओली आहे अशी छोटी छोटी कारणं दाखवून शेतकऱ्यांची तूर नाकारण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर घरी आणली.

पावसाळा तोंडावर आलाय. मुलांचं शिक्षण, लग्न कार्य डोक्यावर आहेत. मग शेतकरी आपली तूर मिळेल तिथं मिळेल त्या भावानं विकतायेत. संदीप यांनी त्यांची तूर 3 हजार आठशे रुपये क्विंटलने विकली.

तूर घरात पडून असल्यानं शेतकऱ्याची कोंडी झालीये. ही कोंडी काही केल्या फुटत नाही. चारही बाजुनं नाकाबंदी झालेल्या शेतकऱ्यावर आर्थिक कडेलोटाची वेळ आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 10:09 PM IST

ताज्या बातम्या