#सन्मानयात्रा : शेतकऱ्यांचा सन्मान कसा मिळणार?

विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणं दानवेंवर टीका केलीय. पण ते सत्तेत होते त्यावेळेसही त्यांनीही शेतकऱ्यांना कधी धरण दाखवलं तर एकेरीवर आले. प्रश्न असाय की शेतकऱ्यांचा सन्मान कसा मिळणार?

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 07:30 PM IST

#सन्मानयात्रा : शेतकऱ्यांचा सन्मान कसा मिळणार?

सुबोध जाधव, जालना

11 मे : एखाद्या माणसाचं चारित्र्य तपासायचं असेल तर त्याला थोडीशी सत्ता देऊन बघा तो कसा वागतो ते आणि त्यानंतर त्याचं चारित्र्य ठरवा असा एक सुविचार आहे. रावसाहेब दानवेंची वक्तव्य बघितली तर सत्ताधारी कसा नसावा ह्याचे सगळे पुरावे ते रोज उठता बसता देतायत असं दिसतंय.

मराठवाड्यात बोलता बोलता सालं, साले म्हणण्याची पद्धत आहे. पण दानवेंनी जो टोन वापरलाय तो मात्र शिवीगाळीचा आहे. एका कार्यकर्त्यानं तूरीवर प्रश्न विचारला तर दानवे शेतकऱ्यांबाबत एकेरीवर आले. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची त्यांनी शोधलेली पद्धत फक्त आणि फक्त सत्तेचा माजच दाखवतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:ला शेतकरी म्हणून सांगत असतात, दानवेंच्या पक्षाचं सगळे मंत्रिमंडळ कसं शेतकऱ्यांचं आहे किंवा शेतकऱ्यांची काळजी करणारं आहे हे ते पुन्हा पुन्हा सांगत असतात. पण ते सगळं मतं मिळवताना. एकदा सत्ता आली की हेच दानवे कधी काय लिहून मागतील पत्ता नाही.

विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणं दानवेंवर टीका केलीय. पण ते सत्तेत होते त्यावेळेसही त्यांनीही शेतकऱ्यांना कधी धरण दाखवलं तर एकेरीवर आले. प्रश्न असाय की शेतकऱ्यांचा सन्मान कसा मिळणार?

कर्जमाफी असो की तूर खरेदी, सरकार काही उपकार करत नाही. मोसंबी, कांदा, तूर, मिरची अशा सगळ्यांचे भाव नरेंद्र-देवेंद्रच्या शेतकरीविरोधी धोरणानं पडलेत. त्यात सुधारणा केली नाही तर रावसाहेब, जनता असा माज करणाऱ्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close