राष्ट्रपतीपदाची निवडणूक : शरद पवारांच्या मनात चाललंय काय ?

शरद पवारांनी जरी इन्कार केलाय. दुसरीकडे मात्र एका नावावर सर्वसहमती व्हावी अशी पवारांची अपेक्षा आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 10:54 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : शरद पवारांच्या मनात चाललंय काय ?

 उदय जाधव आणि सागर सुरवसे,सोलापूर

25 एप्रिल : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू झालीये. पवारांनी जरी इन्कार केलाय. दुसरीकडे मात्र एका नावावर सर्वसहमती व्हावी अशी पवारांची अपेक्षा आहे. त्यामुळे पवारांच्या नेमकं मनात आहे तरी काय असा प्रश्न विचारला जातोय.

नवी दिल्लीच्या रायसिना हिल्सवर कोण जाणार याची चर्चा आता जोर धरू लागलीये. चर्चेत अनेक नावं आहेत. पण महाराष्ट्रात चर्चा आहे ती शरद पवारांची...शरद पवारांच्याही महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीत. यापूर्वी त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. पण आकड्यांच्या गणितानं त्यांना कधीच साथ दिली नाही. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांचं नाव चर्चेत आलंय. पण यावेळेसही आकडे काही त्यांना साथ देत नाहीएत.

मोदी आणि शरद पवार यांची मैत्री ही सगळ्यांना माहिती आहे. त्यातच डावे पक्ष पवारांच्या नावासाठी आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांनी सर्वसंमतीनं एक नाव द्यावं अशी खेळी खेळलीय.

दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनीही पवारांच्या नावाला पसंती दाखवलीय. भागवतांच्या नावाचा आग्रह धरणारी शिवसेना पवारांबद्दल मात्र मोदींच्या मैत्रीचा दाखला देतेय.

Loading...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक उमेदवार दिला तर ते उमेदवार पवार असावेत असे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश मिळतं का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...