पाटील साहेब,हे खड्डे बुजवणार का?

पाटील साहेब,हे खड्डे बुजवणार का?

मुंबईहून आग्र्याला जातानाचा नाशिकपर्यंतचा रस्ता प्रवाशांचं कम्बरडं मोडणारा ठरतो आहे.

  • Share this:

02 सप्टेंबर : खड्डे हे जवळपास सर्वाच शहरांमधलं भीषण वास्तव. मुंबई, नाशिक, नागपूर या सर्व रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासलंय.

हे रस्ते मुंबईचे आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर ठिकठिकाणी अशी रस्त्यांची चाळण झालीय. काँग्रेसनं या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना भाजपला लक्ष्य केलं आहे.

मुंबई-नाशिक महामार्गाची कहाणी काही वेगळी नाही. मुंबईहून आग्र्याला जातानाचा नाशिकपर्यंतचा रस्ता प्रवाशांचं कम्बरडं मोडणारा ठरतो आहे. आणि या खड्ड्यांची जबाबदारी कंत्राटदार घेत नाहीय.

नागपुरातल्या खड्ड्यांची कहाणी तर आरटीआयमधूनच समोर आलीय.

चंद्रकांतदादा, करदात्याला असे रस्ते तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. पाटील साहेब, होईल तितक्या लवकर हे खड्डे बुजवाल का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 05:09 PM IST

ताज्या बातम्या