पालघर पोटनिवडणूक : भाजपला शिवसेनेचं कडवं आव्हान

मात्र पालघर मतदारसंघात मित्र पक्ष शिवसेनेनं उभं केलेलं आव्हान भाजपच्या जिव्हारी लागलंय. आता या पोट निवडणुकीतील विजय स्थानिक मतदार ठरवतील.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 14, 2018 10:20 PM IST

पालघर पोटनिवडणूक : भाजपला शिवसेनेचं कडवं आव्हान

विजय राऊतसह उदय जाधव,मुंबई

14 मे : अखेर पालघर लोकसभा पोट निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाने माघार न घेता, भाजपला उघड आव्हान दिलंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आणि शेवटच्या मीनटापर्यंत भाजपने ही पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आकाश पाताळ एक केलं मात्र त्यांना काहीच यश मिळालं नाही.

पालघर लोकसभा पोट निवडणूक आता पंचरंगी होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांपैकी ५ अपक्षांनी माघार घेतली. तर २ डमी उमेदवारांनीही माघार घेतली. त्यामुळे सर्व मोठ्या पक्षांनी माघार न घेता भाजपला दंड धोपटून आव्हान दिलंय. आता रिंगणात असलेले प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत.

1)पालघर लोकसभा पोट निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत.

2)पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिलीय.  

Loading...

3)शिवसेनेनं भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे जेष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिलीय.

 4)याशिवाय बहुजन विकास आघाडीने त्यांचे याच मतदारसंघतील माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय.

5) तर काँग्रेसनेही माजी खासदार दामू शिंगडा यांना उमेदवारी दिलीय.

6) सीपीएम (लाल बावटा) ने किरण गहला यांना उमेदवारी दिलीय.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ही पोट निवडणूक होतेय. मात्र चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने भाजपवर हल्लाबोल करत राम राम ठोकला. आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे जेष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन भाजपला कोंडीत पकडले. त्यामुळे खवळलेल्या भाजप श्रेष्ठींनी ही पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व दबाव तंत्राचा वापर केला. मात्र त्याला कोणत्याच पक्षानं साथ दिली नाही.

पालघरचा किल्ला सर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन मतदारसंघात तळ ठोकून होते. मात्र ही पोट निवडणूक बिनविरोध जिंकण्याचे भाजपचे मनसुबे पुर्ण झाले नाहीत.

महाराष्ट्रात पालघर सोबतच गोंदिया लोकसभेची ही पोट निवडणूक होतेय. मात्र पालघर मतदारसंघात मित्र पक्ष शिवसेनेनं उभं केलेलं आव्हान भाजपच्या जिव्हारी लागलंय. आता या पोट निवडणुकीतील विजय स्थानिक मतदार ठरवतील. पण भाजपला त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात कडवं आव्हान उभं राहिलंय एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2018 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...