News18 Lokmat

नारायणगाव..तमाशा कलावंतांची पंढरी, नेमकं काय आहे काळोबाच्या यात्रेचे आकर्षण

तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताईदेवी व काळोबा देवस्थानची यात्रा 1 मे पासून सुरु झाली आहे. तमाशा कलावंतांचे माहेरघर असलेल्या यात्रेला आणि येतील फुक्कट तमाशाच्या बारीला अनेक तमाशा शोकीन गर्दी करत आहेत. काय आहे नारायणगाव यात्रा आणि तमाशा कलावंत, यांच्यातील नातं उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट...

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 07:35 PM IST

नारायणगाव..तमाशा कलावंतांची पंढरी, नेमकं काय आहे काळोबाच्या यात्रेचे आकर्षण

रायचंद शिंदे/ स्मिता शिंदे (प्रतिनिधी)-

नारायणगाव, (पुणे)- तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताईदेवी व काळोबा देवस्थानची यात्रा 1 मे पासून सुरु झाली आहे. तमाशा कलावंतांचे माहेरघर असलेल्या यात्रेला आणि येतील फुक्कट तमाशाच्या बारीला अनेक तमाशा शोकीन गर्दी करत आहेत. काय आहे नारायणगाव यात्रा आणि तमाशा कलावंत, यांच्यातील नातं उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट...

नारायणगाव..तमाशा कलावंत आणि फडमालक असलेल्या तमाशा साम्रादनी कै.विठाबाई भाऊ मांग यांचं हे गाव.. राज्यभरातील तमाशा कलावंतांचे माहेरघर म्हणूनही या गावची ओळख आहे. येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानचा यात्रोत्सव नुकताच सुरु झाला आहे. तब्बल 8 दिवस ही यात्रा रंगते. नावाजलेल्या तमाशा फडमालक येथे हजेरी लावतात. इथं तमाशा होतो तो कोणतेही मानधन न घेता. या ठिकाणी जी बारी वरचढ ठरते त्या बारीला राज्यभर मागणी असते शिवाय बिदागी पण चांगली मिळते.

यात्रा काळात रोज रात्री 10 च्या नंतर नामांकित फडमालक आपल्या तमाशा बारीची इथे सादरीकरण करतात. कलावंतांचा मोठा संच, विद्युत रोषणाई आणि मिमिक्रीसोबत लावण्या, हिंदी मराठी ऑर्केस्टातील गाण्याची बेधुंद गाणी एक से बढकर एक नर्तकींच्या ठेक्यावर रात्रभर इथे बहरली जाते. यात्रेला उपस्थित राहणाऱ्या तमाशा फडमालकांना,कलावंताना आणि यात्रेकरूंना या ठिकाणी सर्व सोयी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. नारायणगाव ग्रामस्थांना तमाशा कालावंताचा यामुळे मोठा अभिमानच आहे.

यात्रोत्सवात मिरवणुकीत आकर्षण असते ते ढोलताशा पथकांच्या गजराचा आणि घागरींचा. परिसरातील नामांकित ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतात. यासोबत यात्रोत्सवात आकर्षण आहे, ते येथील मंदिर आणि परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईचे. एलईडी दिव्यांचा वापर करून यंदाही नेत्रदीपक विद्युत रोषणाई उभारण्यात आली आहे. यासोबत नारायणगावची यात्रा प्रसिद्ध आहे ती शोभेच्या दारुकामामुळे. मागील 40 वर्षांपासून हे शोभेचे दारूकाम या यात्रेचे आकर्षण ठरत असून राज्यभरातील तमाशा शौकीन हा अविष्कार पाहण्यासाठी इथे गर्दी करत असतात. नारायणगाव येथील मुस्लिम कुटुंबातील आतार आणि मनियार बंधू दरवषी मोफत पणे ही सेवा ते या ठिकाणी सादर करतात...

Loading...

मंडळी अशी आहे ही राज्यातील सर्वात मोठी आणि तमाशा कालावंतांचं माहेरघर असलेली तमाशाची यात्रा. तर मग इचार कसला करताय तुम्हाला बी इथं तमाशाचा अस्सल गावरान नजारा अनुभवायचा असेल तर अजूनही 3 दिवस शिल्लक आहेत. पकडा गाडी आणि निघा बिगी बिगी...


SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...