S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

खुशखबर! आंगणेवाडी जत्रेनिमित्त कोकणात मध्य रेल्वेच्या विशेष चार फेऱ्या

भराडीदेवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार हे नक्की. खालील प्रमाणे या विशेष गाड्याचं वेळापत्रक असणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2018 02:10 PM IST

खुशखबर! आंगणेवाडी जत्रेनिमित्त कोकणात मध्य रेल्वेच्या विशेष चार फेऱ्या

07 जानेवारी : जानेवारी महिना सुरू झाला की कोकणवासियांना वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेचे! यंदादेखील ही जत्रा २७ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे. आंगणेवाडीच्या जत्रेला जाणा-या भाविकांसाठी मध्य रेल्वेनं खूशखबर दिली आहे. आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त विशेष चार फे-या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

आजपासून या गाड्यांचं बुकिंग सुरु झालंय. एलटीटी आणि सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे भराडीदेवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार हे नक्की. खालील प्रमाणे या विशेष गाड्याचं वेळापत्रक असणार आहे.

आंगणेवाडीसाठी विशेष गाड्या


गाडी क्रमांक 01161

26 जानेवारी

एलटीटीहून पहाटे 1.10 वा. सुटणार

सावंतवाडीला सकाळी 10.30 वा. पोहोचणार

गाडी क्रमांक 01162

26 जानेवारी

सावंतवाडीहून दु. 12.30 वा. सुटणार

एलटीटीला रात्री 10.20 वा. पोहोचणार

- दोन्ही गाड्यांना 1 एसी टू-टीयर, 3 एसी 3-टीयर, 13 स्लीपर क्लास आणि 3 जनरल डबे

- थांबे - ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, नांगगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

गाडी क्रमांक 01157

27 जानेवारी

सीएसएमटीहून पहाटे 12.20 वा. सुटणार

सावंतवाडीला सकाळी 10.30 वा. पोहोचणार

गाडी क्रमांक 01158

28 जानेवारी

सावंतवाडीहून दु. 2 वा. सुटणार

सीएसएमटीला रात्री 11.55 वा. पोहोचणार

- दोन्ही गाड्यांना 5 एसी 3-टीयर, 5 स्लीपर क्लास आणि 8 सेकंड क्लासचे डबे

- थांबे - दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, नांगगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close